चांगली कामगिरी वाशी रेल्वे पोलीस ठाणे झटका मारून मोबाईल चोरी करणार्या आरोपीस पकडून मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेबाबत.
दि. 28/09/2021 रोजी फिर्यादी यश केसे, वय -27, रा -अंधेरी, मुंबई हे ठाणे ते घणसोली असा प्रवास करत असताना रबाळे ते घणसोली रेल्वे स्टेशन दरम्यान एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातावर फटका मारून त्यांचा मोबाईल फोन पाडून चोरून नेलेबाबत वाशी रेल्वे पो ठाणे येथे cr no 135/2021 कलम 382 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या सूचनेनुसार घटनास्थळ परिसरामध्ये डीबी पथकाचे मार्फतीने दररोज सकाळी सात ते अकरा या कालावधीत सापळा लावण्यात येत होता. आज रोजी डीबी स्टाफने घटनास्थळ परिसरात सापळा लावला असताना एक अनोळखी इसम घटनास्थळ परिसरामध्ये संशयित रित्या वावरताना दिसुन आला. त्यावेळी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. त्यावेळी स्टाफने त्याचा पाठलाग करून पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने नमूदचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून चोरीस गेलेला गुन्ह्यातील 60000/-रु किंमत चा सॅमसंग मोबाईल फोन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर आरोपीस अटक करण्यात आली असून त्याचा पूर्वाअभिलेख निरंक आहे.
आरोपीचे नाव- संजय प्रताप चौव्हान, वय -27, रा – ठाणे बेलापूर हायवे रबाळे ब्रिज खाली, रबाळे, नवी मुंबई, मुळ रा. राजस्थान.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार तसेच मा. पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ यांचे मार्गदर्शनानुसार वि. द. केसरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मपोनि घरटे, पोनि पाडवी, सपोनि लाड ASI नलावडे, पो.ह. 3387 पाटील , wpn 787 शिंदे, pc 1315 दराडे, pc 134 हांडे, pc 914 मनवर, pc pc 1041 फुंदे, pc-977 शिंदे, PC 1496 मैदाड 1490 धायतडक यांनी केलेली आहे.
( *व्ही डी केसरकर* )
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
वाशी रेल्वे पोलीस ठाणे.