जासई हायस्कूल मध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री या महापुरुषांची जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.या प्रसंगी जगाला अहिंसा,सत्य,आणि सहिष्णूता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान – जय किसान घोषणेचे प्रणेते माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या जयंती सोहळ्यास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, जासई गाव विकास आघाडी चे अध्यक्ष यशवंत घरत, नरेश घरत,व्हॉईस चेअरमन रामभाऊ घरत,अमृत ठाकूर, लॉरी चालक मालक संघाचे अध्यक्ष सुनील घरत,ग्रामपंचायत सदस्या अरुणा घरत इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हा जयंती सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफवर्कर अरुण घाग सर,आणि प्रा.सुहास शिंदे, म्हात्रे डी.बी, ठाकरे एस.पी,डी.के.पाटील,ठाकूर एस.एम.आणि रयत सेवकांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख सर यांनी केले.