इलेक्ट्रॉनिक केबलची चोरी करणार्या गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने केले गजाआड
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः पनवेलसह नवीन पनवेल परिसरात इलेक्ट्रॉनिक केबलची चोरी करणार्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने गजाआड केल्याने अनेक उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील चोरी या सदरखालील गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. बिपीन कुमार सिंह पोलीस आयुक्त, महेश घुर्ये अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी व गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी दिलेले आदेशाप्रमाणे सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व विनोद चव्हाण सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष – 3 गुन्हे शाखे चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व पथक कडून मालमत्तेच्या संदर्भातील गुन्हयांचा समांतर तपास सुरु होता. वाशी पोलीस ठाणे गुरक्र. 364/2021 भादंवि कलम 379 या गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळी भेट देवून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज यांचे आधारे सदर गुन्हयाचा तपास करित असताना सपोनि खरोटे व अंमलदार पोहवा कोळी, पोना पाटील, जेजूरकर, जोशी, मोरे, फुलकर असे तळोजा परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना भारत वजन काटयाजवळ वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचे वर्णनाशी मिळता जुळता ईलेक्ट्रीक केबल ड्रम मोटार ट्रक क्र. एम एच 46 ए आर 7669 मधून वाहतूक करित असताना आढळून आल्याने सदर पोलीस पथकाने मोटार ट्रक थांबवून त्यामधील ईसम नामे राजपत राममिलन गौड याचेकडे सदर ट्रकमधील ईलेक्ट्रीक केबलचा बंडलबाबत चौकशी करता, त्याने ट्रकमधील मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. नमुद इसमास विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल व अधिक तपास करता, त्याने सदरचा ईलेक्ट्रीक केबलचा बंडल त्याचा साथीदार नामे शानू उर्फ हनिफ रा. शिवडी, मुंबई याचे सहाय्याने मनी मार्केट, वाशी नवी मुंबई येथून चोरी करुन सदरचा बंडल भाडयाने घेतलेला मोटार ट्रक क्र.एम एच 46 ए आर 7669 मध्ये ठेवला होता. सदर चोरी केलेल्या मालाची विल्हेवाट लावेपयर्ंत सदरचा ट्रक तळोजा परिसरात ड्रायव्हर यास पार्क करण्यास सांगून सदर मालाची विल्हेवाट लावणेकरिता घेवून जात असल्याचे आरोपीकडे केलेल्या चौकशी दरम्यान आढळून आल्याने वाशी पोलीस ठाणेकडे चौकशी केली असता, सदरचा माल हा वर नमुद गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आले असून जवळपास 17 लाख 63 हजार 146 रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये इतरही आरोपींचा सहभाग आहे. या आरोपींवर पनवेलसह वालीव, काशिमीरा आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर आरोपींचा तपास करण्यामध्ये कक्ष-03, गुन्हे शाखेचे वपोनि शत्रुघ्न माळी, सपोनि/ईशान खरोटे, सपोनि शेंडगे यांचेसह पोलीस अमलदार यांनी महत्वपुर्ण कामगीरी बजावलेली आहे.