पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅस व महागाई विरोधात उरण तालुका शिवसेना-युवासेनेचा सायकल मोर्चा. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जनतेचा आक्रोशाचा रस्त्यावर उतरून केला निषेध.
उरण दि 31(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना- युवासेना उरण तालुक्याच्या वतीने पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकल रॅलीचे आयोजन रविवार दिनाकं 31 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आले.शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईचा रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला. नूर मुल्ला पेट्रोल पंप, कोटनाका उरण येथून निघालेला सायकल मोर्चा शिवसेना शहर शाखे जवळ आल्या नंतर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅसच्या दरात भरमसाट वाढलेल्या महगाई रोखण्यास आलेले अपयश याचा निषेध करून, केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाहळकर, नगरसेवक अतुल ठाकूर, विभागप्रमुख डॉमनिक कोळी, युवासेना उपअधिकारी निशांत घरत, महिला आघाडी मुमताज भाटकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील, युवासेना तालुका अधिकारी हितेश पाटील, शहर अधिकारी नयन भोईर, द्रोणागिरी युवासेना शहरअधिकारी करण पाटील, उपतालुकासंघटक के. एम. घरत, उपशहरप्रमुख अरविंद पाटील, द्रोणागिरी उपशहरप्रमुख प्रतिक पाटील, मच्छिद्रनाथ पाटील, शहरसंघटक महेश वर्तक, प्रशांत पाटील, रविंद्र पाटील, अश्फाख खान, धनंजय शिंदे, प्रसाद पाटील, जितेंद्र पाटील, लक्ष्मण म्हात्रे, शिवेंद्र म्हात्रे, नारायण तांडेल, सचिन पाटील, प्रितम म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, मणीराम पाटील उपस्थित होते.