क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनमध्ये असंख्य महिलांचा प्रवेश.
पनवेल / प्रतिनिधी : क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनमध्ये असंख्य महिला सदस्यांचा प्रवेश झाला असून संघटनेच्या कामाबाबतीत पेठगाव येथे महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ.रूपालिताई शिंदे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच नवीन सर्व महिलांनी संस्थेत यावेळी सदस्यत्व स्वीकारले ,तसेच क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन तर्फे उटणे वाटप करण्यात आले यावेळी पेठगाव येथील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.