श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे फराळ वाटप
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )समाजाच्या मूळ प्रवाहापासून लांब असलेल्या, विकासापासून वंचित असलेल्या गोर गरीब आदिवासीच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा. दिवाळी निमित्त त्यांना दिवाळीचे फराळ वाटप करून करून त्यांचे सुख दुःख समजून घेण्याच्या दृष्टी कोणातून आदिवासींच्या जीवनात सहभागी होत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील चिरनेर येथील अक्कादेवी आदिवासी वाडी येथे फराळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक सुधीर मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक, कृष्णा कोळी, माधव म्हात्रे, विकी पाटील अभिनेते सुभाष कडू, अक्कादेवी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सन्नी बोरसे, प्रशांत होमने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.दरवर्षी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप करण्यात येत असून याही वर्षी फराळ वाटप करण्यात आल्याचे प्रास्तविकात सुनील वर्तक यांनी सांगितले. तर संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरु असून संस्थेने आदिवासी बांधवांच्या सुख दुःखात सहभागी होत दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम राबवून खऱ्या अर्थाने आपली दिवाळी साजरी केली आहे. आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद दिसला असे सांगत संस्थेच्या विविध उपक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक सुधीर मुंबईकर यांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील तर आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.