महाराष्ट्र प्रदेश माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भास्कर परते व श्री. सोनू वर्मा यांची विदर्भच्या अध्यक्ष पदी निवड
प्रतिनिधी :आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विदर्भाच्या कामगार साठी भरीव योगदान देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नवीन नियुक्ती जाहिर.
महाराष्ट्र प्रदेश माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष श्री. संजय वासुदेव पवार यांच्या आदेशानुसार श्री. भास्कर परते यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि श्री. सोनू वर्मा यांची विदर्भ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
आज नागपुरात युनियनच्या बैठकीत श्री. निरंजन देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवुन, नवनिर्वाचितानचे अभिनंदन करण्यात आले व कामगारांच्या हितासाठी कार्यरत राहण्याकरिता पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.