शिवसेना उरणच्या वतीने दिवाळी पहाट-संगीतमय कार्यक्रमाने उरणकर नागरिक झाले मंत्रमुग्ध.
उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )
गुरवार ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळीच्या पहिल्या पहाटे शिवसेना उरण शहर व तालुका तर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिवाळी पहाट हा संगीतमय कार्यक्रम गणपती चौक, उरण शहर येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संगीत विशारद किर्ती रमेश गोंधळी, कुमारी आसावरी रमेश गोंधळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध रागामध्ये बंदिश-भक्तीगीते व भावगीते सादर करून उरणकरांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर,मालती मनोहर भोईर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, माजी नगरसेवक निलेश भोईर, माजी शहरसंघटक महेश वर्तक, उपजिल्हासंघटक ममता पाटील, अवजड वाहतूक तालुकाध्यक्ष चेतन म्हात्रे, विधी सेल तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, गणेश पाटील, शिक्षकसेनेचे कौशिक ठाकूर, महेश गावंड, रमणिक म्हात्रे, शिवेंद्र म्हात्रे, मनिराम पाटील, नंदू पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते, उरण मधील नागरिक उपस्थित होते.