इंटरनॅशनल हुमन राईट्स ऑरगनायजेशनच्या तालुकाध्यक्ष पदी अरविंद पवार.
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )इंटरनॅशनल हुमन राईट्स ऑरगनायझेशन हि संघटना मानवी हक्काच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघटनेच्या माध्यमातून होत असते. या संघटनेचे कार्य व विचार तळागाळात जावेत, गोर गरिबांना न्याय मिळावा या दृष्टीकोनातून या संघटनेच्या उरण तालुकाध्यक्ष पदी केगाव येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद नारायण पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेने आतापर्यंत अनेक समस्यांना न्याय दिला आहे. या संघटनेच्या उरण तालुका अध्यक्षपदी अरविंद पवार यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.