- डाॅ.श्री .संजय मोरेश्वर पोतदार यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी /भारतीय उद्योग जगतातील निवडक फक्त ५० तसेच महाराष्ट्रातून विशेष उल्लेखनीय प्राविण्य मिळवलेले केवळ *दोनच रत्नांची* निवड करण्यात आल्याचा हा सन्मान सोहळा नुकताच गोवा येथे पार पडला.
इसरो जेष्ठ संशोधक डाॅ.टि.एन.सुरेश कुमार आणि प्रोफेसर डाॅ.सिविदर गिल ,उपकुलगुरू तसेच पंजाब विद्यापीठाचे डिन यांच्या हस्ते डाॅ.श्री संजय पोतदार यांना उद्योग रत्न म्हणून सन्मान चिन्ह, पदक,तसेच सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी मिळालेली डाॅक्टरेट,आणि आता उद्योग रत्न
अशा एकामागून एक मिळालेला सन्मान हा खरोखरच अभिमानास्पद आहे.
डाॅ.श्री.संजय मोरेश्वर पोतदार.यांनी मागील ४०ते ४५ वर्ष अहोरात्र प्रचंड मेहनत करून स्वताला सिध्द केले.
अशा दैदिप्यमान इतिहास घडवणार्या व्यक्तिमत्वाचा उद्योग रत्न सन्मान हा सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे. ज्ञातीमधील सर्वजण, नातेवाईक, मित्रपरिवार पनवेल तसेच रायगड परिसरातील सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.