श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा.
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील उरण नगर परिषद हददीतील श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण ( बोरी )यांच्या वतीने बुधवार (दि. १० ) रोजी सकाळी ६ वाजता श्री साई मंदिर उरण (बोरी – पाखाडी ) ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा निघाली. यंदाचे पालखीचे हे ८ वे वर्ष आहे .
पदयात्रा बुधवार ( दि. १० )ते बुधवार (दि. १७ ) नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे.पदयात्रेला बुधवार ( दि. १० )रोजी सकाळी ६ वाजता श्री साई मंदिर उरण (बोरी- पखाडी )सुरुवात झाली .पुढे वैष्णवी हॉटेल ,स्वामी विवेकानंद चौक ,देऊळवाडी (शंकर मंदिर ),गणपती चौक ,राजपाल नाका ,कोट नाका ,राघोबा देव मंदिर येथे अल्पोपहार करून पुढे नवीमुंबई हून शिर्डी येथे रवाना झाली. धनंजय भोरे,दिपक थळी ,सुरेश अय्यर ( अण्णा ),हरिराम शर्मा ,सुयोग ठाकूर ,राजेश पुरव ,सिद्धार्थ म्हात्रे सिद्धार्थ सुर्वे ,रोहन पारधी ,हंसराज चव्हाण ,प्रशांत शिरधनकर ,प्रलय तारेकर ,ओमकार राऊत मयुरेश पाटील ,विशाल जाधव ,भूषण पाटील ,मयुरेश सदशियन ,चेतन माळी ,गणेश तांडेल ,जयेश म्हात्रे आदी साई भक्त या पदयात्रा सोहळा मध्ये सहभागी झाले आहेत.