बालदिनानिमित्त दिशा महिला व्यासपीठाने ओपन एज्युकेशन मधील मुलांसाठी बालमहोत्सव
पनवेल /वार्ताहर : असुडगाव येथे 15 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित केला होता. या बालदिनानिमित्त रोज डोंबाऱ्याचा खेळ करून पोटाची खळगी भरणाऱ्या मुलांसाठी डॉ कोलते व सौ. अनिता कोलते मॅडम यांनी ब्रिज खाली सुरु केलेल्या शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी हा दिवस आनंदात, उत्साहात जावा यासाठी आयोजन केले होते. चपलेऐवजी पायाखाली दोर असणाऱ्या या अनवाणी चालणाऱ्या मुलांना चप्पल वाटप, नाश्ता,कपडे व बालदीन विशेष केक कापून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्यांचबरोबर विद्या मोहिते व ख़ुशी सावर्डेकर यांनी मुलांबरोबर गप्पा गोष्टी करत विविध स्पर्धाचे आयोजन करून बक्षीस वाटप व शैक्षणिक साहित्य मुलांसाठी दिले . एक दिवस उत्साहात साजरा झाला म्हणून मुलांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद दिसत होता .या मुलांसाठी एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, उद्योगपती गजानन साळुंखे ( बापू )तसेच निरव नंदोला तसेच दिशा व्यासपीठाच्या हिरकणी डॉ शिल्पा भंडारवर, मनिषा मोरे, भावना सरदेसाई, प्रज्ञा मोरे, सविता महाले, प्रिया पाटील, रूपा कवीश्वर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या बालदिना निमित्त मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मंगेश आढाव, शुभांगी खरात, डॉ रुक्मिणी तसेच दिशा व्यासपीठाच्या सख्यांची उपस्थिती लाभली. दिशा सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष निलम आंधळे यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.