फुटपाथवर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमाचा उपचार दरम्यान मृत्यू
प्रतिनिधी/पनवेल-रायगड : नवीन पनवेल येथील सेक्टर 13 मधील जनता मार्केट जवळ फुटपाथ वरती 22-09-2021 रोजी बेशुद्ध अवस्थेमध्ये काही दिवसापूर्वी अनोळखी इसम आढळून आला होता. सदर इसमास वाशी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु उपचार चालू असताना दिनांक 23-09-2021 रोजी त्याचा मृत्यू झाला तरी सदर इसमाची ची ओळख पटलेली नाही, इसमाचे वर्णन – अंदाजे वय – 30,रंग सावळा, उजव्या हाताच्या मनगटावर अतुल असे नाव दिलेले आहे. केस – काळे मिशी -साधारण सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास खांदेश्वर पोलीस ठाणे 2227465338 येथे संपर्क करावा असे आव्हान खांदेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एम. जे करचे साहेब यांनी केले आहे