द्रोणागिरी सेक्टर 30 येथील ट्रान्सफॉर्मर चे दुरुस्तीकरण अथवा नुतनीकरण
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे एम.एस.सी.बी.अधिकारी केतन थत्ते यांनी ट्रान्सफॉर्मर ची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्तीकरण करून देऊ असे आश्वासन दिले आहे. डेपो च्या आजूबाजूला खूप गवत वाढले असून त्यामुळे स्पार्क होऊन विजेचा खोळंबा होत आहे म्हणून येत्या मंगळवारी गवत साफसफाई करण्यात येईल असे केतन थत्ते यांनी सांगितले.
यावेळी एम.एस.सी.बी अधिकारी केतन थत्ते, शिवसेना द्रोणागिरी शहर सचिव धनंजय शिंदे, द्रोणागिरी सेक्टर ५० चे शाखाप्रमुख अंकुश चव्हाण, सन्नी पार्टे,राहुल पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना शाखा द्रोणागिरीने सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ट्रान्सफॉर्मरची व इतर समस्या सुटणार असल्याने द्रोणागिरी परिसरातील नागरिकांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.