गणेश वाजेकर यांची नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )गणेश वाजेकर यांची उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. गणेश वाजेकर हे शांत, संयमी, समाजसेवी व्यक्तिमत्व असून नवघर ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी आजपर्यंत अनेक विकासकामे केली आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड उपसरपंच पदी बिनविरोध झाली आहे.असे मत व्यक्त करत सुधीर घरत सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा कामगार नेते सुधीर घरत,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण पाटील,तसेच नवघर ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी गणेश वाजेकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.नवनिर्वाचित उपसरपंच गणेश वाजेकर यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.