जासई विद्यालयात 10 वी – 12 वी बोर्ड परीक्षा आवेदन पत्र भरण्याचा शुभेच्छा समारंभ संपन्न
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार इयत्ता 10 वी व 12वी या बोर्ड परीक्षांचे आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.बोर्ड परीक्षा आवेदन पत्र भरण्याच्या या शुभेच्छा समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष,कामगार नेते,भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील उपस्थित होते.या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या पुढील राहिलेल्या दिवसात नियोजन पूर्वक अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेले पाहिजे,आणि या विद्यालयाची यशस्वी निकालाची परंपरा कायम टिकविली पाहिजे असे मार्गदर्शन करून प्रमुख पाहुणे सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेछा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे चेअमन अरुण जगे हे होते. प्रास्ताविक प्रा.शेडगे सर यांनी करून प्रा.अतुल पाटील व रयत सेवक संघाचे समन्वयक शेख एन. एच.यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग सर यांनी बोर्ड फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी हे आपल्या मनोगतातून सांगितले.या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक साळुंखे आर.एस.तसेच इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन म्हात्रे एम. डी.यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबर एस. एम.यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.