नवेपोपूड येथे दत्तजयंती उत्साहात साजरी.
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )परमपूज्य ॐदत्त श्रीठाकूरमहाराजांचे गाव असलेले ॐदत्तवाडी , नवेपोपूड उरण येथे दत्तजयंती सोहळा शुक्रवार दि.१७/१२/२०२१ व शनिवार १८/१२/२०२१ रोजी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.शुक्रवार दि.१७/१२/२०२१रोजी सकाळी पहाटे ०४.४५ वाजता श्री.निनाददादांनी श्रीगुरुचरित्र चक्रिपारायणास सुरुवात केली .उरण गावातील सर्व मंडळी यात सामील होते. संपुर्ण दिवस पारायण चालू होता.पारायण समाप्ती नंतर दीपोत्सव त्यानंतर आरती व प्रसाद वाटप करण्यात आले.रात्री करंजा येथील भजनी मंडळाचे सुश्राव्य असे भजन झाले.शनिवार दि.१८/१२/२०२१ रोजी सकाळी पहाटे काकडआरती ,भुपाळी व दत्तबावनी वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली. सकाळी ७.०० वाजता कुंकू मार्चन, सकाळी ८.०० वाजता दत्तयाग,दत्तयाग समाप्ती नंतर विप्र व भक्तांचा भजनफेरा,दत्तपादुकांवर दुग्धाभिषेक व हिनाखस लेपन.पाळणा व आरती.दर्शन आणि महाप्रसाद.सांयकाळी ०५.०० वाजता पालखी सोहळा.रात्री मधुभजन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर सर्व कार्यक्रम कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आयोजित करण्यात आले. नागरिकांनी, भाविक भक्तांनी, शिष्य परिवारांनी सोशल फिजिकल डिस्टन्स पाळून शिस्तीने रांगेत उभे राहून देव दर्शन घेतले.उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेश बालदी, भाजप तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगरसेवक कौशिक शहा, राजू ठाकूर आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्री दत्त देवतेचे दर्शन घेतले.