पनवेल महापालिका,निवडणूक विभाग तर्फे मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृती उच्छव स्विप २०२१अभियान
पनवेल /प्रतिनिधी :पनवेल महापालिका आयुक्त मा.श्री गणेश देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली पनवेल महापालिका,निवडणूक विभाग तर्फे मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृती उच्छव स्विप २०२१अभियान राबविण्यात आले. या अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या सदस्यांचा सन्मान सोहळा आज सकाळी वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी *जाणीव एक सामाजिक संस्था चे श्री प्रसाद हनुमंते यांना ही यावेळी गौरविण्यात आहे* सदर पुरस्कार मा. श्री विजय तळेकर, तहसीलदार पनवेल, मा.श्री गणेश शेटे,उपायुक्त प.म.पा, मा. श्री विठ्ठल डाके,उपायुक्त(मुख्यालय) प.म.पा, मा.श्रीमती वंदना गुळवे,सहाय्यक आयुक्त प.म.पा, मा. श्री सदाशिव कवठे,निवडणूक विभाग प्रमुख प.म.पा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या अभियानाची संपूर्ण ज्यांच्या वर जबाबदारी होती असे मा. श्री विजयजी चव्हाण यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ समाजसेविका सौ अदिती मराठे यांनाही यावेळी गौरविण्यात आले