नगरसेविका सौ सारिका भगत यांच्या नगरसेवक निधीतून खुली जिम चे भूमिपूजन
पनवेल /रायगड :मच्छिन्द्र पाटील 99200 72874
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ सारिका भगत यांच्या नगरसेवक निधीतून खांदा कॉलनी सेक्टर 13 मधील सिडको गार्डनमध्ये खुली जिमचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
सारिका भगत यांच्या माध्यमातून समजपयोगी विविध कामे सातत्याने सुरु आहेत
त्याच्या नगरसेवक निधीतून खुली जिम सुरु झाल्यावर जेष्ठ तरुणांना आदिक उपयोग होऊ शकतो असे मत प्रीतम म्हात्रे साहेब यांनी या वेळी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले या कार्यक्रमास महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम दादा म्हात्रे पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ सुरेखा मोहोकर मॅडम,सौ प्रीती जॉर्ज (म्हात्रे), सौ कुसुम गणेश पाटील तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील सर खांदा कॉलनीतील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते