फणसवाडी येथील मराठी शाळेतील बोअरवेलची तातडीने दुरूस्ती करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल दि.13 (संजय कदम): पनवेल तालुक्यातील फणसवाडी येथील मराठी शाळेतील बोअरवेलची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी शिवसेना तालुका महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील यांनी पनवेल महानगरपालिका खारघर प्रभाग अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात गुरूनाथ पाटील यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्हा परिषद शाळा फणसवाडी या शाळेतील बोअरवेल गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या या परिसरातील आदीवासी विद्यार्थी बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. तरी या संदर्भात पनवेल महानगरपालिकेने लक्ष घालून तातडीने बोअरवेल दुरूस्ती करून घेऊन येथील पाण्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटोः गुरुनाथ पाटील