*जनकल्याण रक्तकेंद्र महाड येथे मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न..*
*महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे १० वे वर्ष*
महाड/प्रतिनिधी
दि. ८ मार्च २०२२ रोजी रक्तकेंद्र महाड येथे *”जागतिक महिला दिनानिमित्त”* महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन केले होते या शिबिरात महाड शहरातील तसेच महाड लगतच्या गावातील १०० पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला या शिबिरात ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे अशा महिलांना डॉ. वैशाली मिंडे यांचे मार्गदर्शन लाभले आजच्या या
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित महिला वर्ग व महिला कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते भारतमाता पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच कार्यक्रमासाठी रक्तकेंद्राच्या महिला संचालिका डॉ. वैशाली मिंडे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते या कार्यकमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून सर्व स्तरावरुन शुभेच्छा देण्यात आल्या.