महिला पत्रकारांचा जनाधर्मा आधारगृह वृद्धाश्रमात महिला दिन साजरा
पनवेल /रायगड
महिला दिना निमित्त अनेक ठिकाणी विविध कारेक्रम आयोजित केले गेले भरमसाठ खर्च करत कारेक्रम केले जातात परंतु जागतिक महिला दिन या दिवसाला आगळे वेगळे वळण देता व वायफळ खर्च टाळून पनवेल मधील महिला पत्रकार यांनी मिळून एक प्रेरणादायी उपक्रम राबवला यामध्ये सर्व महिला पत्रकारांनी पत्रकार सनिप कलोते यांच्या जनाधर्मा आधारगृह वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथे फळ मेडिसिन बिस्किट इत्यादी वस्तूंचे वाटप करून एक अनोखा उपक्रम राबवला. वृद्धाश्रमात महिला दिनानिमित्त वेळ घालवून तसेच येथे या सर्व वस्तूंचे वाटप करून एक वेगळा आनंद मिळाल्याचे मनोगत या महिला पत्रकारांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर दर वर्षी देखील महिला दिनानिमित्त असेच नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी आशा घालमे, शीतल पाटील, शाहीन शेख, पूनम शिवशरण, अश्विनी म्हात्रे, सावित्रा शेटे, निशा माने आदि महिला पत्रकार उपस्थित होत्या