- शिवजयंती निमित्त रायगड जिल्हा मनसेतर्फे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
उरण/प्रतिनिधी :
दि.20 मार्च 2022रोजी शिवजयंती चे औचित्य साधुन कुंडेवहाळ गावात महाराष्ट्र नवनिर्माण शाखेचे उद़्घाटन करण्यात आले. शाखेचे उद़्घाटन अविनाश जाधव (ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण नावीक सेना) ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अतुल भगत (रायगड जिल्हाध्यक्ष) व सचिन गोळे (सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) ह्यांची सुद्धा उपस्थित होती. मान्यवरांनी कुंडेवहाळ च्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच ओवळे ह्या गावात डिजिटल बोर्ड व सेल्फि पॉईंटचा उद़्घाटन सोहळा सुद्धा मोठ्या दिमाखात पार पाडला. डिजिटल बोर्ड व सेल्फि पॉईंटचे उद़्घाटन अविनाश जाधव (ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण नावीक सेना) ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अतुल भगत (रायगड जिल्हाध्यक्ष) व सचिन गोळे (सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) ह्यांची सुद्धा उपस्थित होती.
ह्यावेळी कुंडेवहाळ व ओवळे गावातील शेकडो तरुण-तरुणींनी तसेच नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.वरील दोन्ही कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व सर्व कार्यकर्त्यांमध्ये खुशीचे वातावरण होते.
सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्याकडे अनेक नागरिक आकर्षित होऊन बऱ्याच नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बाकीच्या राजकीय पक्षातील नेेत्यांमध्ये पक्षबांधणीसाठी हालचाल करण्यास सुरवात झाली आहे.रायगड जिल्हा व नवी मुंबई मध्ये जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचा प्रचार व प्रसार जोरात सुरु आहे. त्यामुळे तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आकर्षण वाढत आहे.