पुढील पाच वर्षात रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतसंस्थेची प्रत्येक तालुक्यात शाखा निर्माण करणार
-पॅनल प्रमुख नरसु पाटील.
उरण /प्रतिनिधी :
रविवार दिनांक 20/3/2022 रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतसंस्थेची 30 वी सर्वसाधारण वार्षिक सभा एम एन पाटील सहकार भवन पेण येथे चेअरमन रवींद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य टी. डी. एफ संघटनेचे कार्याध्यक्ष आणि एम. एन. पाटील सहकार पॅनलचे पॅनल प्रमुख नरसु पाटील यांच्या शुभहस्ते जी. एम. पाटील सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
नरसु पाटील यांनी आपल्या भाषणातून संचालक मंडळाच्या कार्याचा गौरव करताना पतसंस्थेच्या विकासामध्ये हातभार लावणाऱ्या सर्व मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त केले. आणि येत्या पाच वर्षात विद्या सेवक पतसंस्थेच्या शाखा प्रत्येक तालुक्यात निर्माण करणार आणि पतसंस्थेला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणार असे उपस्थितांना अभिवचन दिले. वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी चेअरमन व विद्यमान संचालक के. पी. पाटील यांनी अभ्यासपूर्वक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विषय पत्रिकेनुसार इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन, अंदाजपत्रक वाचन, इत्यादी विषयांचे वाचन संस्थेचे सचिव रमाकांत गावंड यांनी आपल्या खास शैलीत केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष नरेश हर्णेकर यांनी केले.
इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदर्श शिक्षक व संचालक मंडळाचा सत्कार पॅनल प्रमुख व प्रमुख पाहुणे नरसु पाटील, जि. एम. पाटील, मिलिंद जोशी, बाबा गडगे, आर. एन. म्हात्रे, आर. के. म्हात्रे, टी.बी. मोकल, डि. आर. मोकल, बी.पी. म्हात्रे,शिवाजी माने या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सुरूवातीला ईशस्तवन, स्वागत गीत, महाराष्ट्र गीत संगीत विशारद रंजन ठाकूर, रायगड भूषण संतोष घरत, विवेक घरत यांनी सादर केली. यावेळी पतसंस्थे साठी गेली तीस वर्षे योगदान दिलेल्या ज्येष्ठ मार्गदर्शक बी. पी. म्हात्रे, आर. के. म्हात्रे, टी. बी. मोकल, मिलिंद जोशी, सुरेश पालकर, अशोक काटे यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आर. के. म्हात्रे, टी. बी. मोकल, बी.पी. म्हात्रे, मिलिंद जोशी जी.एम. पाटील, रवींद्र वाघमारे इत्यादी मान्यवरांनी पत्तसंस्थेच्या कार्याबाबत सविस्तरपणे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सभेसाठी चेअरमन रवींद्र वाघमारे, सचिव रमाकांत गावंड, उपाध्यक्ष नरेश हर्णेकर, खजिनदार रवींद्रसिंग गिरासे, ज्येष्ठ संचालक के. पी. पाटील, राजेंद्र पवार, प्रदीप मुरूमकर, अनील अंबावले, नरेंद्र मोकल, गणपत शेलार, दिनेश नागे, वैशाली गोळे, सुषमा भोपी इत्यादी विद्यमान संचालक, पत्रकार राजेंद्र पोवार, मनोज पाटील, अशपाक मुकादम, सुरेश माळी, लीयाकत धनसे, एम. टी. पाटील, अमित टेंभोडे, विजय पाटील आणि प्रत्येक तालुक्यातील सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.