कोरोनाच्या साथीला विसरून परत एकदा मोठ्या उत्साहात बामणडोंगरी गावात शिवजयंती साजरी.
उरण /प्रतिनिधी :दरवर्षीप्रमाणे धूम धडाक्यात साजरी होणारी शिवजयंती गेल्या वर्षी अगदी साध्या पद्धतीने पार पडली होती. परंतु सोमवार दि.21/3/2022 रोजी जाणता राजा सामाजिक विकास मंडळ बामणडोंगरी यांच्या विद्यमाने बामणडोंगरी गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी टिम जाणता राजाचे दिवंगत सहकारी स्व.धनंजय म्हात्रे आणि स्व.निवास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर संस्थेच्या वतीने आयोजित केले होते. तसेच संध्याकाळी संपुर्ण बामणडोंगरी गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ढोल – ताशांच्या गजरासह पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुले, महिला वर्ग, तरुण, जेष्ठ नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती कार्यक्रमास रविंद्र पाटील (गव्हाण जिल्हा परिषद सदस्य), अमर केसरीनाथ म्हात्रे (उपसरपंच वहाळ ग्रामपंचायत), माधव पाटील (जेष्ठ पत्रकार), राजु मुंबईकर (संस्थापक – CON), विवेक मोकल (संस्थापक, शिवराज्य संकल्प संस्था), रामदास नाईक (मा.उपसरपंच), संजय नाईक (चेयरमन बामणडोंगरी शाळा), संजय खोत, मंगेश म्हात्रे, किरण म्हात्रे, एन.आर.आय. पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचारी, उलवे फायर स्टेशन येथील जवान, आर्या स्पोर्ट्स बामणडोंगरीचे पदाधिकारी आणि आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने अनिकेत ठाकूर, अंकित नाईक, सुहास म्हात्रे, अक्षय पाटील, रुणीत ठाकुर, रमेश नाईक, आशिर्वाद पाटील, प्रतिक पाटील, प्राणिल म्हात्रे, रवी भोईर, सतेज म्हात्रे आदींनी या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीपणे सांभाळले.