बेवारस मृतदेहाच्या नातेवाईकांचे पनवेल शहर पोलिसांकडून शोध
पनवेल,(प्रतिनिधी) — पाडेघर, जे.डब्लू आर गोडाऊनच्या समोर पानवेलकडे जाणार्या महामार्गाच्या बाजूला एका मोकळ्या जागेत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व त्या मृत महिलेला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती महिला मृत झाल्याचे घोषित केले. यावेळी याबाबत पनवेल शहर पोलसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात करण्यात आली आहे. या महिलेचे वय अंदाजे 55 ते 60 वर्ष, रंग सावळा, उंची ५ फूट १ इंच, चेहरा गोल, डोक्याचे केस सफेद, अंगामध्ये पांढऱ्या मळकट रंगाचा ब्लाऊज, निळसर व राखाडी रंगाचे फुलाचे डिझाईन असलेली साडी, फिकट गुलाबी रंगाचा परकर, गळ्यात पांढऱ्या मण्यांची माळ, नाकावर व चेहर्यावर काळपट डाग पडलेले अश्या वर्णनाच्या महिलेची माहिती कोणाकडे असल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.