महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी रामदास पाटील
पनवेल (रायगड )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी रामदास पाटील यांची नेमणूक करण्यात आली. दिनांक 22/03 /2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी रामदास पाटील यांची नियुक्ती मुंबई ह्या ठिकाणी करण्यात आली ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय व धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी असे राजसाहेबांनी ह्यावेळी बोलताना सांगितले ,
मराठी बांधवांवर भगिनींना भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो अशी प्रार्थना करत रामदास पाटील यांना त्यांच्या कारकिर्दीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांनीही रामदास पाटील यांचे कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, तसेच रामदास पाटील यांनी राज साहेबांकडे पनवेल मधील विविध समस्या सांगत चर्चा करण्यात आली व ती कामे आता लवकरात लवकर मार्गी लावू व आणखी जोमाने काम करू, रामदास पाटील यांनी ह्या पदाचा स्वीकार करून प्रामाणिक व एकनिष्ठने कार्य करू असे आश्वासन दिले…