- *तोडलेल्या शौचालयाच्या जागी पत्रकार कक्ष (कंटेनर) साठी जागा द्यावी. क्रियाशील प्रेसक्लबची मागणी.*
- पनवेल /प्रतिनिधी :
- पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सार्वजनिक शौचालय नुकतेच तोडण्यात आले. पनवेलमधील पत्रकार अनेक वर्षे पत्रकारांना बसण्यासाठी जागेची मागणी करीत आहोत. नुकतेच हे शौचालय तोडण्यात आल्याने सदर जागा मोकळी झालेली आहे व इथे कोणी दुसरे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी याठिकाणी पत्रकारांना पत्रकार कक्षासाठी कंटेनर ठेवण्यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी क्रियाशील प्रेसक्लब पनवेल यांच्यावतीने पनवेल महानगरपालिकेस इमेलद्वारे पत्र पाठवून करण्यात आली आहे.