रायगड जिल्हा परिषद प्राथमिक सारडे शाळेत प्रयोग शाळेचे उद्घाट
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे)संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या सारडे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रयोग शाळेचे उद्घाटन घनश्याम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. सारडे शाळेचे माजी मुख्याध्यापक स्व. रा.जा.म्हात्रे गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव घनश्याम म्हात्रे यांनी हे प्रयोग साहित्य दिले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा नसते. त्यामुळे मुलांना हायस्कुलला गेल्यानंतर हाताळायची सवय लागते.परंतु सारडे शाळेतील मुलांना पहिली पासून प्रयोग साहित्याची ओळख व हाताळण्याची सवय लागावी यादृष्टीने घनश्याम म्हात्रे व कुंटुबियांनी दिलेल्या साहित्य हे महत्वाचे आहे.
या कार्यक्रमाला रयत शिक्षिका कांता पाटील,सारडे गावचे सरपंच चंद्रशेखर पाटील, हायकोर्टचे वकील हिरामण पाटील,व्यवस्थापण अध्यक्ष वैशाली पाटील,ग्रामपंचायत सदस्य भारती पाटील,समीर पाटील,शामकांत पाटील, व्यवस्थापण सदस्य शुभांगी म्हात्रे,मंगेश पाटील,मनुजा पाटील ,राजश्री कडू, कराटे पट्टू गोपाळ म्हात्रे सहित रा.जा म्हात्रे गुरुजींचे कुटुंबीय उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे,उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर, तंत्रस्नेही शिक्षक सुनील नऱ्हे यांनी विशेष मेहनत घेतली.