काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे आमदार व्हावेत.-भजनसम्राट, महादेवबुवा शहाबाजकर.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जासई काँग्रेस कमिटीतर्फे श्री.सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते.यंदा या महापुजेचे १४ वे वर्ष होते त्या निमित्ताने भजनसम्राट महादेवबुवा शहाबाजकर यांच्या शुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला.त्यांची कन्या मिनल पाटील व नातू कु.गंधर्व पराग शहाबाजकर यांनी त्यांना साथ दिली.
रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांचा जासई काँग्रेस कमिटीतर्फे भजनसम्राट महादेवबुवा शहाबाजकर यांच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महादेव बुवा शहाबाजकर म्हणाले की, सर्व सामान्यांची जाण असणारे व शून्यातून विश्व् निर्माण करणारे महेंद्रशेठ घरत हे जिल्हाध्यक्ष झालेत तसेच एकवेळ आमदार व्हावेत व भविष्यात होतीलच. समाज्यातील दिन गरिबांची जाण असलेला नेता म्हणजे महेंद्रशेठ घरत आहेत.
या महापूजेसाठी.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव संतोष केणे ,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आर. सी घरत ,रायगड काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, ह. भ. प धावजीशेठ पाटील,उपाध्यक्ष. किरिट पाटील,कल्याण जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष. राहुल केणे,उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे,पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष. नंदराज मुंगाजी,खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारिंगे, मा. जि. प. सदस्य डॉ. मनिष पाटील, पनवेल पं. स. माजी उपसभापती वसंत काठावले, रायगड युवक अध्यक्ष निखिल ढवळे, महाराष्ट्र फिशर मॅन संघटनेचे कोकण अध्यक्ष मार्तंड नाखवा, पनवेल शहर जिल्हा ओ. बी. सि. सेल अध्यक्ष वैभव पाटील,रायगड जिल्हा OBC सेलचे अध्यक्ष. उमेश भोईर,उरण विधानसभा युवक अध्यक्ष रोहित घरत, रायगड काँग्रेस महिला उपाध्यक्षा संध्याताई ठाकूर,उरण तालुका महिला अध्यक्षा रेखाताई घरत,निर्मला पाटील,उरण तालुका सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत,परशुराम भोईर, जयवंत पाटील,भालचंद्र घरत,जासई विभागीय अध्यक्ष विनोद पाटील,शंकर ठाकूर, राजेंद्र भगत,महेंद्र मुंबईकर, जगदीश पाटील,विवेकानंद म्हात्रे,विक्की पाटील,योगेश रसाळ,बापु मोकळ,बाळा पाटील.तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रमेश पाटील,संजय ठाकूर, वंदना पाटील, निराबाई म्हात्रे,यशवंत घरत, विवेक म्हात्रे, आदित्य घरत यांचे कौतुक केले.तसेच जासई काँग्रेस कमिटी, महिला कमिटी, युवक कमिटी यांचे आभार मानले.