शिवसेना- उरण तालुका व शहर तर्फे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात निर्दशने
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील व शहरातील सर्व शिवसेनेच्या, युवासेनेच्या, महिला आघाडी, अंगीकृत संघटनेच्या आजी- माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांतर्फे गुरुवार दि. ०७/०४/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता शिवसेना शहर शाखे जवळ I N S विक्रांत च्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा किरीट सोमय्याने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे.त्याच्या विरोधात देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करा या मागणीसाठी निर्दशने करण्यात आली.
यावेळी मनोहरशेठ भोईर माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख रायगड,दिनेश पाटील माजी जिल्हाप्रमुख,नरेश रहाळकर उपजिल्हाप्रमुख रायगड,संतोषजी ठाकूर तालुका प्रमुख उरण, महादेव घरत उरण विधानसभा संपर्कप्रमुख,बी एन डाकी तालुका संघटक,जे पी म्हात्रे तालुका संपर्कप्रमुख,गणेश शिंदे शिवसेना गटनेता उ.न.प,धिरज बुंदे-संपर्क प्रमुख-शिवसेना अवजड वाहतूक सेना,उरण रायगड,विनोद म्हात्रे शहर प्रमुख उरण,नितेश पाटील युवा अधिकारी उरण विधानसभा अधिकारी,हितेश पाटील तालुका अधिकारी उरण,नयन भोईर शहर अधिकारी उरण,आरोग्य विभाग प्रमुख संदीप जाधव, संजय मेश्राम, संजय गावंड, गणेश म्हात्रे,परमानंद करंगुटकर,महेंद्र पाटील, एस के पुरो, उमेश भंडारी, प्रवीण मुकादम,संदीप चव्हाण तर महिला पदाधिकाऱ्यांमध्ये तालुका संघटिका सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे, विधानसभा संपर्क प्रमुख प्रणिता म्हात्रे, वंदना पवार, मुमताज भाटकर,नलिनी मेश्राम,रुबीना, सायरा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करत किरीट सोमय्या यांनीही मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांना त्वरित अटक करावे. लोकांकडून भीक मागून स्वतः जवळ जमा केलेले पैसे शासन दरबारी जमा केलेले नाही त्यामुळे किरीट सोमय्या यांना अटक करा अशी मागणी करत नांगर लावून बैल बनवून किरीट सोमय्याना आम्ही फिरवू असे सांगितले. तर उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांनीही भाजपच्या नेत्यांवर टीका करत किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला.खासदारकी न मिळाल्याने किरीट सोमय्या शिवसेनेवर आरोप करीत आहेत.त्यांना पोटशुळ झाला आहे. ईडी द्वारे भाजप कारवाई करत आहे. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे धुतल्या तांदळा सारखे आहेत का ? किरीट सोमय्यानी INS विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला पैसा गेला कुठे त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली. तर सर्वात शेवटी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर चाललेल्या ईडी कारवाईचा निषेध केला.मनोहरशेठ बोलताना म्हणाले की किरीट सोमय्या हे इंटलीजेन्स ब्युरो असल्यासारखे सर्वत्र फिरत आहेत. शासनाचा फुकटचा प्रोटेक्शन घेऊन फिरत आहेत. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मात्र एखादा गुजराती मारवाडी येऊन मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या नेत्याला उलट सुलट बोलत असेल तर शिवसैनिक किरीट सोमय्याना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. विक्रांत युद्ध नौकेचा पैसा गोळा करून किरीट सोमय्यानी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे.विक्रांत नौके साठी भीक मागून पैसा जमा केला हे जमा केलेला पैसा शासनाजवळ जमा झालेले नाही. हे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. अशा भ्रष्टाचारी नेत्यावर कारवाई झालीच पाहिजे. किरीट सोमय्या यांना रायगड जिल्ह्यात कुठेही फिरू देणार नाही असा निर्धारच मनोहरशेठ भोईर यांनी केला.