युनिफाइड आर्ट्स अँड क्राफ्ट इव्हेंट
पनवेल दि.०८ (वार्ताहर) : राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबई संस्थेकडून जागतिक स्वमग्न दिवस साजरा केला जात आहे. स्वमग्न जागरूकता सप्ताहाचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबई द्वारे “युनिफाइड आर्ट्स अँड क्राफ्ट इव्हेंट” आयोजित केला होता. बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांग (दिव्यांगजन) मुलांनी त्यांच्या पालकांसह सहभाग घेतला.
यावेळी मोठ्या संख्येने विशेष मुले, पालक, प्रशिक्षणार्थी, संस्थेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे व्याख्यता ज्योती खरात, डी. सावंत, विशेष शिक्षक शर्मिश्ठा घोष, गायत्री कवडे, सुरेश बेडके,संतोष शेलार यांनी केले. संपुर्ण कार्यक्रम डॉ रवी प्रकाश सिंह संस्थेचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
फोटो : युनिफाइड आर्ट्स अँड क्राफ्ट इव्हेंटमध्ये सहभाग घेतलेली मुले व पालक