अंध मुलीला लॅपटॉप भेट
पनवेल दि.०८ (वार्ताहर) : स्नेहकुंज आधारगृह, नेरे येथे अंध मुलगी निवेदिता प्रमोद कुडवळकर या मुलीला लॅपटॉप भेट देण्यात आला.
नेरे येथील नितिन जोशी यांची या मुलीची कामोठे येथे एका कार्यक्रमात भेट झाली. हि मुलगी अंध आहे हे त्याना माहीत नव्हते. तीचं सुंदर असे गाणे ऐकत असताना तीला बक्षीस देण्यात आले. त्यावेळेस तेथील निवेदकाने सांगितले कि ती अंध मुलगी आहे. यावेली जोशी हे तीच्या पालकांना भेटलो व काही मदत लागल्यास सांगा यावेली त्यानी सांगितले कि तीला लॅपटॉपची गरज आहे. ती आवाज ऐकून अभ्यास करेल असे तीच्या पालकांनी सांगीतले. हि गोष्ट जोशी यानी त्यांच्या मित्राना सांगितली, ते लगेच तयार झाले. व या मुलीला लॅपटॉप भेट देण्यात आला. लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल स्टिल टाऊन आणि स्नेहकुंज आधार गृह नेरे यांच्या वतीने तीला लॅपटॉप भेट देण्यात आला. या कार्यक्रमास मिलींद पाटील (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स), उमेश जाधव, हेमंत लोणकर, रेखा लोणकर, रमाकांत म्हात्रे (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल स्टिल टाऊन ), संगीता म्हात्रे, प्रकाश घाडगे, संगीता जोशी (अध्यक्ष, स्नेहकुंज आधार गृह), नितीन नाना जोशी उपस्थित होते.
फोटो : लॅपटॉप भेट देताना उपस्थित मान्यवर