चुकीचा उपचार केल्याप्रकरणी पनवेलमधील लाईफ लाईन हॉस्पिटलला दणका. तक्रारदार रवींद्र पाटील यांना १५ लाख रुपये भरून देण्याचा न्यायालयाने दिला निर्णय.
पनवेल / प्रतिनिधी
सन २००९ साली दिनांक ०२/१२/२००९ रोजी तक्रारदार रवींद्र पाटील हे बुलेट मोटार सायकल क्रमांक MH-43 B- 42 या वाहनाने जात असताना डंपर क्रमांक MH-05-K-7184 चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. पोलीसानी रुग्णवाहिका बोलवली असता सदर चालकाने कमिशन मिळण्याच्या उद्देशाने तक्रारदार रवींद्र पाटील यास लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये भरती केले. समोरील व्यक्तीने मित्र व नातेवाईकाना भेटू दिले नाही व मनामध्ये भिती निर्माण केली. कुठलीही माहिती न देता पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच डाव्या पायाची घुडग्यापासून ते तळ पायापर्यंतची रक्तवाहीनी काढून टाकण्यात आली. याबद्दल विचारणा केली असता समोरील व्यक्तीने सदरची वाहिनी उजव्या पायात बसविण्यात आलेली आहे. उजवा पाय फ्रॅक्चर झाला असताना डाव्या पायाची शस्त्रक्रिया करण्याची गरज नव्हती. लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तक्रारदार रवींद्र पाटील यांचा उजवा पाय कापून डावा पाय अपंग करून मेडिकलचे बिल बील देवून बाहेर पडले. नंतर डॉ. नितीन म्हात्रे यांच्याकडे उचार केले तेंव्हा तक्रारदार रवींद्र पाटील यांना फरक पडला. लाईफ लाईन हॉस्पीटलने रक्कम रुपये २,००,०००/- मेडीसीन व रक्कम रुपये १,२५,०००/- फी घेतली. त्यानंतर दिनांक २७/०१/२०१० रोजी जे. जे. हॉस्पीटल मुंबई येथे ऍडमिट झाले २१ दिवस हॉस्पीटलमध्ये उपचार केले व फक्त रक्कम रुपये २५०००/- मध्ये यशस्वी सर्जरी झाली व इनफेक्शन सुध्दा क्लियर झाले. त्यानंतर तक्रारदार रवींद्र पाटील यांनी दिनांक २४/०३/२०१० रोजी मेडीकल ट्रीटमेंटची फाईल दया नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा अर्ज दिला. त्यानंतर तक्रारदार रवींद्र पाटील यांना सदरची फाईल देण्यात आली.निष्काळजीपणामुळे तक्रारदार रवींद्र पाटील यांचे जीवन उध्दवस्त झाले. तक्रारदार रवींद्र पाटील यांना दोन मुले आहेत व त्यांना आता कायमचे अपंगत्व आले आहे. प्रस्तूतची तक्रार सदरची मेडीकलची रक्कम व्याजासह परत मिळण्याकरीता तसेच नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यासाठी तक्रारदार रवींद्र पाटील यांनी दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने लाईफ लाईन हॉस्पिटल यांना सेवा देण्यात न्यूनता, निष्काळजीपणा, हलगर्जीपणास जबाबदार धरून मानसिक व आर्थिक त्रासाबाबत १५ लाख रुपये रक्कम भरून देण्याचा निर्णय दिला आहे. तसेच ४५ दिवसांच्या आतमध्ये हि रक्कम भरून देण्यास न्यायालयाने आदेशित केले आहे. तक्रारदार रवींद्र पाटील यांच्यातर्फे ऍड. वैशाली बंगेरा यांनी बाजू मांडली होती.अपघात ग्रस्त एडवोकेट रवींद्र पाटील यांच्यावर चुकीचे उपचार केल्याप्रकरणी न्यायालयाने 15 लाख रुपयांचा दंड पनवेल शहरातील नामवंत हॉस्पिटल प्रसिद्ध असलेल्या लाईफ लाईन हॉस्पिटलला ठोठावला असल्याने हॉस्पिटल क्षेत्रात खळबळ माजली आहे. यापूर्वी अनेक वेळा चुकीचे उपचार करून रुग्णांचा जीव धोक्यात घातल्या च्या घटना इतरही हॉस्पिटल कडून झालेल्या आहेत. मात्र दंडात्मक कारवाई ही प्रथमच झाल्याची माहिती मिळत असल्याने अशा घटना घडू नये म्हणून या दंडात्मक कारवाईने बेजबाबदारपणे वागणाऱ्या तसेच रुग्णांचा जीव धोक्यात घालून आपला आर्थिक फायदा बघण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसेल.