रा.जि.प. प्राथमिक शाळा करळ येथे शाळापूर्वतयारी मेळावा कार्यक्रम उत्साहात साजरा
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे)रा.जि.प.करळ शाळेत शाळापूर्वतयारी मेळावा कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमापूजन व दीपप्रज्वलननाने सामाजिक कार्यकर्ते वसंत तांडेल व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय तांडेल यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रितम वर्तक यांनी केले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ,सदस्य, सदस्या , तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रभावती तांडेल ,जागृती तांडेल , नर्मदा तांडेल,वैशाली ठाकूर,प्रियंका तांडेल, अंगणवाडी सेविका निशाताई तांडेल ,रोहिणीताई तांडेल, रंजना ताई ,अनुसयाताई तांडेल यांसमवेत गावातील मान्यवर सुजित तांडेल,प्रतिक कडू उपस्थित होते.शाळेत नव्याने पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाटावर उभे करून औक्षण केले.विद्यार्थ्यांची सेल्फी घेण्यात आली.पुष्पगच्छ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले.शाळा पूर्वतयारीनुसार सात टेबल मांडण्यात आले होते.यातून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून कृती करून मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच प्रसंगी कार्यक्रमास दाखल पात्र मुले,पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडीताई,मदतनीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी कु.राजवीर प्रतिक कडू मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले.तर वसंत तांडेल आणि सुजित तांडेल यांनी आर्थिक स्वरूपात देणगी दिली.शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विजय कडू यांनी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था सांभाळली.
शाळापूर्वतयारी बाल मेळाव्याचे फलित म्हणजे मेळाव्याच्या दिवशी तब्बल २३ दाखलपात्र विद्यार्थ्यांची शाळेत पटनोंदणी झाली आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने ५००० ₹ चा शैक्षणिक उठाव निधी शाळेला प्राप्त झाला.
यावेळी शिक्षक प्रितम वर्तक यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापिका श्रीम.म्हात्रे मैडम यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.