“रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरेचे मुख्याध्यापक केशव जयराम गावंड यांना सेवानिवृत्ती निरोप.”
उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील गेल्या ३७ वर्ष ५ महिने यशस्वीपणे सेवा देणारे मुख्याध्यापक केशव जयराम गावंड यांचा गुरुवार दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी सेवा निवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.उन्हाळ्यात मे महिन्यात शाळेला सुट्टी असल्याने ( निवृत्त दिनांक ३१ मे २०२२ )शिक्षक केशव गावंड यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या सेवापूर्ती निमित्त कोप्रोली केंद्राच्या कार्यालयात मोठया उत्साहात संपन्न झाला. त्यांना शाळेतील शिक्षक, शिक्षीका आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत स्नेहभाव पुर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
केंद्र प्रमुख संगीता चंदने यांच्या हस्ते सेवा निवृत्त मुख्याध्यापक केशव जयराम गावंड व पत्नी कल्पना केशव गावंड यांचा यथोचित सत्कार आणि गौरव करुन त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश चंदने, गोंधळीसर, बा.ज. म्हात्रे, उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकुर, हितेंद्र म्हात्रे, प्रशांत कोळी. चंद्रकांत गावंड आदीसह ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
या वेळी केशव गावंड म्हणाले की,१८ डिसेंबर १९८४ रोजी शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून विद्यार्थी घडवून समाज घडविण्याचे काम केले. एकंदरीत माझ्या संपूर्ण सेवा कार्यकाळात मला माझ्या सर्व शिक्षक, शिक्षीका, केंद्र प्रमुख, कर्मचारी, तसेच लोकप्रतिनिधी यांचे कडून मिळालेल्या सहकार्यामुळे मी शिक्षण क्षेत्रात चांगल्याप्रकारे सेवा देवू शकलो, आणि तसा मी प्रयत्नही केला. मी माझ्या आई वडिल आणि कुटुंबातील भाऊ आत्माराम गावंड व बहिणी यांच्या प्रेरणेने घडलो आणि यश मिळवत गेलो. आपल्या कडून शिक्षक या नात्यातून जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी करत गेलो आणि त्यातून समाज घडवत गेलो. सेवा काळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. प्रत्येक कार्यात आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन, मार्गदर्शन, व अनमोल अशी मदत मिळाली बद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी ज्या सुयश शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर गोंधळी सर, बा.ज.म्हात्रे, उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकुर, हितेंद्र म्हात्रे, चंद्रकांत गावंड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले. केशव जयराम गावंड यांना सेवानिवृत्ती निमित्त सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.