आयकर अधिकार्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब रुग्णांची स्वतः केली आरोग्य तपासणी
अनाथ आश्रमात फळां बरोबरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
पनवेल दि.४ ( संजय कदम) आयकर विभागातील सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतः डॉक्टर असल्याने रुग्णांना तपासले! डॉ सचिन मोटे हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. गोरगरीब रुग्णांची आरोग्य तपासणी अनाथ आश्रमात फळां बरोबरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची आरोग्य तपासणी केली. महिलांविषयी अनेक आजारांबाबत तज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रुग्णांना फळवाटप करण्यात आले. डाॅ .मोटे यांनी खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली. आय आर एस झालेल्या अधिकारी हे उच्चपदस्थ असतात. या अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो. परंतु ते या समाजाचे घटक आहे. सामाजिक बांधीलकी, संवेदनशीलता आणि समाजाप्रती आस्था त्यांच्यात असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. गोरगरीबांच्याप्रती कळवळा असतो. हे आय आर एस अधिकारी डॉ सचिन मोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दाखवून दिले. समाजातील विविध घटकांसाठी चे उपक्रम त्यांनी राबवले शनिवारी.30 एप्रिल रोजी कळंबोली येथील स्वामी समर्थ मंदिरात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांची वेगवेगळ्या आजारावर वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली, त्यांना मोफत औषधोपचार करून योग्य सल्ला देण्यात आला. महिलांविषयक वेगवेगळ्या आजारांवर यानिमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये रजो दर्शन ते रजोनिवृत्ती समस्या निवडण्याबाबत तज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला. किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डॉ .सचिन मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गोरगरीब गरजुंना फळे देऊन त्यांच्या प्रती आस्था आणि प्रेम व्यक्त केले. केवळ वाढदिवस नव्हे तर वर्षभर सर्वसामान्य गरीब गरजूंना आयकर विभागात अधिकारी असणाऱ्या डाॅ. मोटे यांच्याकडून मदतीचा हात दिला जातो. तसेच सायंकाळी सामाजिक उपक्रमांना हातभार लावणारी मित्रमंडळी, आरोग्य शिबिरातील डाॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते व मदतनीस यांचा शासनाचे सर्व नियम पाळून छोटेखानी आभार प्रदर्शन व वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले