साईबाबा मंदिर साइधाम बिजघर चा२६ बा वर्धापनदिन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय भक्तिभावाने साजरा
खेड ( प्रतिनिधी) खेड तालुक्यातील प्रख्यात साईबाबा मंदिर साईधाम बिजघर २६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला दि १० रोजी रात्री सवेणी येथील शिंदे वाडी भजन मंडळाचा जागरण कार्यक्रमा निमित्त सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला तर ११ रोजी सकाळी सत्यनारायणाची महापूजा तर दुपारी १ वाजता साई भंडारा आयोजीत करण्यात आला होता तदनंतर बिजघर ग्रामस्थांचे भजन कार्यक्रम संपन्न झाला असे साईबाबा संस्थान साईधाम बिजघरचे प्रवरतक सदानंदराव भोसले यांनी सांगितले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच यशवंतराव भोसले ज्येष्ठ मानकरी सुनीलराव भोसले निवृत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेशराव भोसले केंप्टन राजारामराव भोसले डॉ सत्यवान सोनवणे निवृत पोलीस अधिकारी मोरे विजयराव भोसले महेंद्र भोसले भास्कर भोसले प्रदीप येरूनकर वसंतराव भोसले राकेश भोसले सदानंद चव्हाण व्यापारी कमलेश भोसले श्रीराम भोसले काशिनाथ सुर्वे अरविंद सुर्वे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील भाविकांनी दर्शनासाठी लाभ घेवून सोहळ्याची सांगता झाली या वेळी महीला भाविकांची संख्या लक्ष्णीय होती