नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख श्री बबन पाटील यांचा सत्कार
पनवेल /प्रतिनिधी :
खांदा कॉलनी शिवसेना शहर शाखेच्या वतीने नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री बबन दादा पाटील यांचा आज सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर भारतीय विमानतळ प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीच्या चिटणीस पदी माजी विभाग प्रमुख *श्री प्रवीण कुरणे* यांची नियुक्ती झाल्याबद्दल बबन दादाच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे साहेब उपतालुकाप्रमुख रामदास पाटील साहेब उप महानगरप्रमुख प्रभाकर गोवारी साहेब, मा शहर प्रमुख विजय शेटे, उप महनगर नगर संघटिका मंदाताई जंगले, उपविभाग संघटक श्रीहरी मिसाळ, शाखाप्रमुख अरविंद कासारे(सेक्टर 7) शाखाप्रमुख मंगेश पवार (सेक्टर 8), महिला शाखा संघटिका सौ विनिता कोलते, उपशाखाप्रमुख भोर काका, भास्कर साळवी, मा शाखाप्रमुख विजय कोलते, सुनील नलावडे, विकास गुंड तसेच आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन *उप महानगर प्रमुख श्री लीलाधर भोईर* यांनी केले.