पनवेल मध्ये फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचे आयोजन
पनवेल दि. २५ : पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दिनांक २७ मे २०२२ रोजी रात्री ८.०० वाजता महात्मा जोतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे .
महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयानी प्रेरित सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा , त्यांच्या समाज प्रभोधनासाठीच्या प्रयत्नाचे मोल कळावे या हेतूने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार , संचालक डॉ. बबनराव तायवाडे , प्रा. दिवाकर गमे , लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्हात महात्मा जोतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाचे मोफत आयोजन केले आहे . अनिरुद्ध वनकर यांची नाटकाचे दिग्दर्शन केले असून त्याच्या सह ३० कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे तरी या नाटकाला उपस्थित रहावे असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापिकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे .
फोटो- फुले लिखित तृतीय रत्न नाटक