भारत सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना साहित्य मदत व तपासणी शिबीराचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल दि.१३ : केंद्र सरकारच्या दिव्यांग विभाग,सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना साहित्य मदत व तपासणी शिबीराचे आज मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थिती पनवेल येथे घेण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पनवेल महापालिका अतिरीक्त आयुक्त सौ. दिप्ती सांडभोर, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदिप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, डॅा.सचिन सपंकाळ, शहर प्रमुख पनवेल प्रविण जाधव आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा.श्रीरंग बारणे