वाजे हद्दीमध्ये बैलाची कत्तल, गुन्हा दाखल करण्याची मागणी
पनवेल दि.१३ : पनवेल तालुक्यातील वाजे हद्दीमध्ये दोन ते तीन दिवसांपूर्वी बैलांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाजे हद्दीतील फायर रेंजच्या बाजूला माथेरान रोड लगत ही घटना घडली आहे. अशाप्रकारे बैलांची कत्तल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.
पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी बैल, गाय या जनावरांची चोरी करून त्यांचे कत्तल केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत गुन्हेगाराना धड़ा शिकवण्याची मागणी केली जात आहे. गो हत्येवर बंदी असताना देखील सरार्सपणे गो हत्या केली जात आहे. पनवेलपासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर पनवेल-माथेरान रोड, पोलीस फायर रेंजच्या मागच्या बाजूला वाजे गावाच्या हद्दीत येणाऱ्या जागेत बैलाची कत्तल केली केली आहे. या जागेला रिसचा माल आणि वाका असे बोलतात अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील यांनी दिली.