बालभारती जवळ रेल्वे पटरीच्या बाजूला आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह
पनवेल/प्रतिनिधी :
पनवेल येथील खांदेश्वर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खांदा कॉलनी येथील बालभारती जवळील असलेल्या रेल्वे पटरी जवळील नाल्याजवळ मोकळ्या जागेत अनोळखी महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती सदर महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असतात तेथील डॉक्टरांनी तपासून सदर महिला मृत असल्याचे घोषित केले. सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून खालील प्रकारे मयत महिलेचे वर्णन
अंदाजे वय 40 ते 45 वर्ष वर्ण – रंग – सावळा, केस -काळे वाढलेले,नाक -चपटे , गोल – चेहरा, शरीर बाधा – जाड ,अंगात – गुलाबी रंगाची गाऊन ,व पिवळ्या रंगाचा परकर ह्या महिलेस कोणी ओळखत असल्यास खांदेश्वर पोलीस स्टेशन यांच्याशी 2227465338 या क्रमांकावर संपर्क साधावा पोलीस उपनिरीक्षक अमोल खाडे