स्पर्श सामाजिक संस्थेकडून पत्रकार सुनील पाटील यांचा सत्कार
पनवेल दि.१६ : समाजाप्रती आदर समाजसेवा विशेष करून गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी सतत धडपड जिद्द आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर एक आदर्श संपादक म्हणून काम करणारे सा.वेध विकासाचे संपादक सुनिल पाटील यांचा शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भाताण ग्रामपंचायत सरपंच सुभाष भोईर, मा. सरपंच नंदकुमार मुकादम, मा.उपसरपंच अनिल काठावले, कीर्तनकार शिवचरित्रकार ह.भ. प. संतोष महाराज सते तसेच ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ मंडळी यांच्या शुभ हस्ते भाताणपाडा येथे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
समाजात भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांना वाचा फोडण्याचे काम तर राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्व घडामोडी ह्या आपल्या साप्ताहिक वेध विकासाचा ह्या वर्तमान पत्रामधुन सुनिल पाटील प्रसारित करत असतात. याच सोबत हरिभक्त पारायण कीर्तनकार महाराज, पखवाज वादक गायनाचार्य यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पंचक्रोशी विभागातील तरुण महिलांमडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : पत्रकार सुनील पाटील यांचा सत्कार