अज्ञात चोरट्याने रोख रक्कम केली लंपास
पनवेल दि.१६ : अज्ञात चोरट्याने एका कार्यालयाचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आतील रोख रक्कम लंपास केल्याची घटना तालुक्यातील काळुंद्रे गावात घडली आहे.
काळुंद्रे येथील श्री गणेश मंदिराच्या सभागृहालगत असलेल्या कार्यालयाचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आतील ६२ हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे.