अज्ञात चौकडीने केली एकास जबरी मारहाण
पनवेल दि २० : चार अनोळखी इसमांनी किरकोळ कारणावरून मोटारसायकलस्वारास जबरी मारहाण केल्याची घटना ओरियन मॉल समोरील सर्व्हिस रोड वर घडली आहे.
राहुल चव्हाण (वय ३३) हे त्यांचा मित्र अविनाश कांबळे यांचेसह त्यांच्या मोटारसायकलीवरून घरी जात असताना ओरियन मॉल समोरील सर्व्हिस रोड वर यातील आरोपी हे चार चाकी वाहनातून विरुद्ध दिशेने जात असल्याने तुम्ही चुकीच्या का जात आहेत असे बोलले असता त्यांच्यात वादावादी होऊन चार अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून त्या दोघांना शिवीगाळ करून राहुल चव्हाण यांना त्यांच्याकडे असलेल्या रॉड, बेल्ट व काचेची बॉटलने मारहाण करून त्यांना जखमी केल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.