अल्युमिनियमच्या तारासह विद्युत केबलची अज्ञात चोरट्याने केली चोरी
पनवेल दि २०.: अल्युमिनियमच्या तारासह विद्युत केबलची अज्ञात चोरट्याने केली चोरी झाल्याची घटना तालुक्यातील खानावळे गावात घडली आहे.
टेक्निक कंपनीच्या समोरील रोडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेली पंचवीस हजार रुपये किमतीची अल्युमिनियमची तार तसेच बारा हजार रुपये किमतीची अंडर ग्राउंड वापराची विद्युत केबल असा मिळून सदतीस हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.