विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची भर व्याजासह वसूल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागा,राष्ट्रवादी पक्ष एक नंबरलाच असेल.
-तालुकाध्यक्ष नरेश पाटील
खोपोली / प्रतिनिधी – शीतल पाटील
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची भर व्यकासह वसूल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनात दुजाभाव न ठेवता एकदिलाने काम करा असे अवाहन करीत खासदार सुनील तटकरे, माजी आमदार सुरेश लाड यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद,पंचयत समितीत जनतेला अपेक्षित असणारा विकास झाला आहे. त्यामुळेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष एक नंबरलाच राहिल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस खालापूर तालुकाध्यक्ष नरेश पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे.
आगामी जिल्हा परिषद आणू पंचयत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारगांव येथील कोयनारत्न मुसळे सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन,आणि
बैठक आयोजित करण्यात आली होती.खालापूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष तथा मा.जि.प सभापती नरेश पाटील, रायगड जिल्हा युवकाध्यक्ष अंकित साखरे,कर्जत – खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील,जिल्हा सरचिटणीस शरद कदम,युवक जिल्हा उपाध्यक्ष भूषण पाटील,ज्येष्ठ नेते उद्धव तात्या देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष एच.आर.पाटील, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील,खालापूर तालुका महिलाध्यक्षा श्वेता मनवे,युवती अध्यक्षा प्राची अविनाश पाटील,महिला तालुका संघटक व सरचिटणीस भावना पाटील,माजी युवती अध्यक्षा पूजा धारणे,तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील,जितेंद्र सकपाळ, ग्राहक कक्षाचे तालुकाध्यक्ष किरण हडप, साजगाव विभाग वार्ड अध्यक्ष संजय कडव,राजू ढोकले ,सरचिटणीस महेंद्र सावंत,विद्यार्थी संघटनेचे शुभम सकपाळ, वासांबे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते तर या बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती.
आगामी निवडणुकांसाठी कोणतीही कमी राहू नये यासाठी आम्ही कटीबध्द असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागात वज्रमुठ करा असे नरेश पाटील यांनी सांगत निवडणुकीला सामोरे जात असताना मतदार नोंदणी कडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण स्थानिक निवडणुकांमध्ये त्याचा मोठा फायदा होऊ शकतो या प्रमुख गोष्टी कडे लक्ष केंद्रित करा असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.
कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी गावागावात सामजिक सभागृहाची निर्मिती केली त्यामुळे गावातील ग्रांमस्थाना एकत्र बसण्यासाठी जागा उपलब्द झाली यासह अनेक विकास कामे केली असताना विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा कार्यकर्त्यांच्या मनातील खत असून प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे आगामी काळात यश मिळविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेला विकास जनतेपर्यत पोहचविण्यासाठी सज्ज व्हा असे अवाहन राष्ट्रवादी चे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले आहे.खालापूर पंचयत समितीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा हा जनतेसमोर प्रभावीपणे मांडले पाहिजे. गावगावत नवीन मतदार नोंदणी ची गरज आहे आणि भविष्यात सर्व जागांवर वर्चस्व ठेवण्यासाठी कामाला लागण्याचा संकल्प करण्याचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी मत व्यक्त केले.
राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष नरेश पाटील तर व्यासपीठावर जिल्हा युवकाध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील,जिल्हा सरचिटणीस शरद कदम,युवक जिल्हा उपाध्यक्ष भूषण पाटील छायाचित्रात दिसत आहेत.