ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुई – मोठे भोमच्या सरपंचपदी काँग्रेसच्या अश्विनी लहू भोईर यांची बिनविरोध निवड.
उरण दि 29 उरण तालुक्यातील मोठीजुई – मोठे भोम ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी लहू भोईर यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मोठीजुई येथे जाऊन नवनिर्वाचित सरपंच अश्विनी लहू भोईर यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषद सद्स्य बाजीराव परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.मनिष पाटील, उरण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद म्हात्रे,मोठीजुईचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील, रायगड जिल्हा ओबीसिचे अध्यक्ष उमेश भोईर,रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, जेष्ठ काँग्रेस नेते भालचंद्र घरत, विनोद कदम, रमेश पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच, सद्स्य, गावातील नागरिक व मोठया संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सरपंच पदी निवड झाल्याने अश्विनी भोईर यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही यावेळी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.