रेल्वे प्रवासात महिला पोलिसांच्या मोबाईलची चोरी
पनवेल दि. ०४ : पनवेल येथे राहणाऱ्या एका महिला पोलिसांच्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना रेल्वे प्रवासा दरम्यान घडली आहे .
अर्चना डोंबाळे या पनवेल येथे राहत असून त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत . त्या कुर्ला येथून रेल्वे ने पनवेल येथे घरी परतत असताना प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोबाईलची चोरी केली आहे .